आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत कोरोना लस:सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे मागणी

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कोव्हिन अॅपच्या तांत्रिक त्रुटीमुळे पहिल्या दिवशी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते'

काल (दि.16) पासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्व राज्यांमध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना लस मोफत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉस्पिटलचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी टोपे म्हणाले की, 'लसीकरणासाठी केंद्र सरकाककडून चांगले सहकार्य मिळत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सर्वसामान्यांनादेखील ही लस मोफत द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये मोफत लस देण्याची मागणी केली असून या लशीच्या संपूर्ण खर्चाचा भार हा केंद्र सरकारने उचलावा', अशी चर्चा झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

टोपे पुढे म्हणाले की, 'कोव्हिन अॅपच्या तांत्रिक त्रुटीमुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच 100 टक्के लसीकरण होवू शकले नाही. यापुढे राज्यात आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जाणार आहे. लवकरच बाजारामध्ये 5 ते 6 लशी येणार आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये लस उपलब्ध असणार आहे त्यामुळे लसीचा तुटवडा होणार नाही', अशी माहितीही टोपे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...