आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Victims Statistics Difference Of 2518 Deaths, Difference In Six Days, Consequences Of Technical Difficulty

कोरोना मृतांची संख्या:कोरोना बळींच्या आकडेवारीततब्बल 2518 मृत्यूंची तफावत, सहा दिवसांतील फरक, तांत्रिक अडचणीचा परिणाम

महेश जोशी, एसआयटी | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिती अचूक, अपलोड करण्यात विलंब

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य अनलॉक होत असताना कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू आणि दैनंदिन मृत्यूच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यावर मृत्यू लपवण्याचे आरोप करत असले तरी प्रत्यक्षात जास्तीचे मृत्यू दाखवण्याचा प्रकार समोर आला. यात प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा सरकारने २५१८ अधिक मृत्यू दाखवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्य सरकार कोरोनाबाबत लपवाछपवी करत नसून सर्वकाही पारदर्शी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्य सरकार व आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाबाबतची सविस्तर आकडेवारी जारी केली जाते. ही दोन्ही आकडेवारी तपासल्यास मृत्यूसंख्येत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे.

अशी संकलीत होते आकडेवारी
पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती प्रयोगशाळा आरटीपीसीआर अॅप आणि केंद्राच्या कोव्हीड-१९ पोर्टलवर भरते. त्यास आयसीएमआर आयडी दिला जातो. पोर्टलवर तो त्या जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्ण दिसायला लागतो. तो उपचार घेत असलेले रुग्णालय त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करते. प्रत्येक रुग्णालयाला पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. नेमकी येथेच गफलत होते, असे राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. विशेषत: खासगी रुग्णालये मृतांची आकडेवारी पोर्टलवर वेळेत अपलोड करत नाहीत. त्यामुळे काही मृत्यूचे आकडे प्रलंबित राहतात. नंतर जिल्हा स्तरावरील एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) अधिकारी ही माहिती पोर्टलवर टाकतात. यामुळे त्या दिवशीच्या मृत्यूमध्ये मागील मृत्यू एकत्रित करून एकूण मृत्यूंची संख्या दाखवली जाते. त्यात तफावत येते.

कोर्टाच्या भीतीने आकडेवाढ

सर्वाेच्च न्यायालयाने दिल्लीत केजरीवाल सरकारने दाखवलेल्या मृत्यूच्या आकड्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राला असे आदेश दिलेे तर मागे लपवलेले मृत्यु समोर येतील. दररोजच्या आकडेवारीत ही तूट भरून काढण्यासाठी प्रत्यक्षापेक्षा अधिक मृत्यु दाखवत आहेत. पावसाळी अधिवेशनात तोंडावर पडण्याच्या भीतीने सरकार खरे आकडे बाहेर काढत असल्याचा एका भाजप नेत्याचा आरोप आहे.
माहिती अचूक, अपलोड करण्यात विलंब
कोरोनाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. अनेक रुग्णालयात ती हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. काही ठिकाणी संगणक साक्षरतेचा प्रश्न आहे. अनेकदा सॉफ्टवेअर हँग हाेते किंवा ओपन होत नाही. या साॅफ्टवेअरमध्येही काही त्रुटी आहेत. माहिती अचूक आहे, पण ती वेळेत अपलोड होत नाही. अनेक दिवसांची आकडेवारी एकत्रित अपलोड केली जाते. त्यामुळे ही तफावत दिसून येते. -डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी

बातम्या आणखी आहेत...