आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना काळात अखिल भारतीय ग्राहक पंचायत बनली रुग्णांचा आधार, बेड, व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी मदतीचा हात

लातूर (पंकज जैस्वाल)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिविर मिळवून देण्यासाठीही करताहेत प्रयत्न

जिल्ह्यात दररोज हजारांवर पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ताेकड्या अाराेग्य सुविधेमुळे मनस्ताप सहन करावा लागत अाहे. अनेकांना तर बेडही उपलब्ध हाेत नसल्याने त्यांच्या मदतीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत धावून अाली अाहे. दरराेज जिल्ह्यातील रुग्णालयांना फाेन करून तेथील बेड व व्हेंटिलेटरची स्थिती अपडेट जाणून घेत गरजू रुग्णांना त्या त्या ठिकाणी पाठवले जाते. त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात पंचायतचे सर्व सदस्य निरंतर झटत आहेत.

यासंदर्भात बाेलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे म्हणाले की, कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिक घाबरून जातात. त्यातच शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत ग्राहक पंचायत समन्वयाची भूमिका पार पाडते. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार हे काम केले जाते. संबंधित रुग्णाला सरकारी अथवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. सर्व सदस्यांना मिळून दररोज किमान ५० फोन येतात. आजपर्यंत ग्राहक पंचायतीच्या वतीने अनेकांना बेड मिळवून देण्यात आले आहेत. ऑक्सिजन बेड तसेच काहीवेळा अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटर व इंजेक्शनची गरज शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाते. त्यामुळे रुग्णाला मोठी मदत होते. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनावरील उपचारादरम्यान मदतीसाठी ग्राहक पंचायत तत्पर आहे. यासाठी संबंधितांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश ढवळे, इस्माईल शेख, संगमेश्वर रासुरे, धनराज जाधव, चाकूर तालुका व परिसरातील गावांसाठी दत्तात्रय मिरकले, रेणापुरसाठी संतोष गायकवाड, महादेव बंडे व बळवंतराव कागले, निलंगासाठी सुधीर पुरी, औसा येथे यूनूस चौधरी, अशोक देशमाने, प्रा. नागोराव माने, देवणीसाठी प्रा. माधव गुंडरे, अहमदपूर, अजिज मोमीन जळकोट, शेषेराव माने यांच्याशी लोक संपर्क साधतात.

रेमडेसिविर मिळवून देण्यासाठीही करताहेत प्रयत्न
लातूर जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत काम करत आहे. जिल्ह्यात प्रचंड तुडवटा असला तरी प्रशासनातील यंत्रणेशी संपर्क करून ज्यांना खरी गरज आहे अशा रुग्णांना इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. ज्या रुग्णांचा एचआरसीटी स्कोअर ५ ते ८ आहे अशा रुग्णांचे नातेवाइकही रेमडेसिविरसाठी आग्रह धरतात. अशा स्थितीत त्यांचे समुपदेशन करून गंभीर रुग्णांसाठी इंजेक्शन मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे अॅड. महेश ढवळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...