आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, मृत्यूंची संख्याही घटली; 4 हजार 797 रुग्णांची वाढ तर 3 हजार 710 कोरोनामुक्त

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात रविवारी 4 हजार 797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 3 हजार 710 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर 130 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 64 हजार 219 एवढी आहे.

राज्यात आज झालेल्या 130 रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता 2.11 टक्क्यांवर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 61 लाख 89 हजार 933 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के इतके झाले आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि अहमदनगर या विभागांमध्ये अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...