आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 801 वर; आज सापडले 117 नवीन रुग्ण, पुण्यात मागील चोवीस तासात 5 जणांचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या बर्‍याच भागात रॅपिड स्क्रीनिंग सुरू आहे. - Divya Marathi
मुंबईच्या बर्‍याच भागात रॅपिड स्क्रीनिंग सुरू आहे.
  • जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोकांना कोरोनाची बाधा, स्वतःला क्वारेंटाइन केले

बुधवारी महाराष्ट्रात ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २,८०१ वर गेला आहे. यातच आता आज पुण्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यात ७३ आणि ३४ वर्षीय पुरुषाचा आणि आणखी दोघांचा आहे. मागील चोवीस तासात पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पुण्यातील आत्तापर्यंत मृत संख्या ४२ झाली आहे. 

यातच आता चांगली बातमी आली आहे. औरंगाबादमधली दुसरी महिला ठरली कोरेना मुक्त सोशल झाली आहे. औरंगाबाद शहरातील एन-४ परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, औरंगाबाद महानगर पालिकेने शहरात १३ विशेष अशा फीव्हर क्लिनिकची स्थापना केली आहे. शहरातील संशयित कोविड-१९ रुग्णांमधून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातही एकमेव कोरोना बाधीत रुग्णाचा आयसोलेशनचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला पहिला स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेच निःश्‍वास सोडला आहे. आता सध्याच्या स्थितीत हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

मंगळवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईत ११, पुण्यात ४ व नगर, औरंगाबादच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा १८०वर गेला आहे. राज्यात ४६,५८८ चाचण्यांपैकी ४२,८०८ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मधुमेह,उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षे वयाचा रुग्ण सोमवार दि.१३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आज दि.१५ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

२५९ जण बरे होऊन घरी 

राज्यात आतापर्यंत २५९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ६७,७०१ लोक होम क्वाॅरंटाइन, तर ५,६४७ लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये.  एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. मरकजमध्ये सहभागी राज्यातील ५० भाविक कोरोनाबाधित आढळले.

रुग्णांचा तपशील

मुंबई मनपा १७५६, ठाणे १०, ठाणे मनपा ९६, नवी मुंबई ६३, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ४९, पालघर ५,वसई विरार २९, रायगड ५, पनवेल १०, नाशिक मंडळ ७७, पुणे मंडळ ३५८, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ  २५, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ४१, नागपूर ४५, इतर राज्ये ११.

पुण्यात चौघांचा मृत्यू 

मंगळवारी काेराेनामुळे पुण्यातील मद्यपी २७ वर्षीय तरुणासह ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांत ३ महिलांसह एका पुरुषाचा समावेश अाहे. पुण्यातील बळींचा आकडा ३८ झाला आहे. 

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले होते. भरती केल्यापासून रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. मंगळवारी दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली आहे. यासोबतच एका 17 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे समार आले आहे. हा रुग्ण नव्या भागातला असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे औरंगाबादची कोरोणाग्रस्तांची संख्या 25 झाली आहे. तिकडे अहमदनगरमध्येही एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे.

बुलडाण्यातही आधीच्या कोरोना बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन मलकापूरचे तर एक बुलडाण्याचा आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.

सोमवारी राज्यात एका दिवसांत सर्वाधिक 352 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यातील 70% (242) रुग्ण फक्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबई एकूण 1540 पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी सर्वाधिक 229 रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2463 वर पोहोचली आहे. धारावीत मंगळवारी सकाळी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर पाच नवीन रुग्ण समोर आले आहेत. यासोबत धारावीतील एकूण कोरोनाग्रस्त संख्या 59 झाली आहे. तर, राज्यातील मृतांचा आकडा 162 वर पोहचला आहे.

मुंबईतील सर्वाधिक प्रभावित वरळी कोळीवाड भागाला बीएमसीने 'कंटेनमेंट झोन' घोषित केले आहे. यानंतर येथील लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शासनाने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे जारी केली आहे.

रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्याच्या बाळाला कोरोना

रत्नागिरीतील साखरतर येथील एका 6 महिन्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील संक्रमितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. मुलाच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहिला कोरोनाग्रस्त आज पूर्णपणे बरा होऊन घरी जात आहे. बीडमध्ये मागील 12 तासांत दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांचा अहवाल येणार आहे. 

मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोकांना कोरोनाची लागण 

गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले. सोमवारी संध्याकाळी या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना व्हायरसची पुष्टी झालेल्या लोकांमध्ये 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यानुसार, इतर लोकांमध्ये आव्हाड यांच्या बंगल्यावर कार्यरत स्वयंपाकी, सफाई कामगार, बंगल्यावर कार्यरत स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...