आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Virus Outbreak Updates: Permission To Travel Inter district From Tomorrow Cancellation Of E pass Condition; News And Live Updates

ब्रेक द चेनची नवी नियमावली:आंतरजिल्हा प्रवास करण्यास उद्यापासून परवानगी, ई-पासची अट रद्द; विविध पाच पातळ्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन महिन्यांत सर्वात कमी रुग्णवाढ, रिकव्हरी रेट 95%

लाॅकडाऊनमध्ये सोमवार, दि. ७ जूनपासून राज्यभरात िनयम सैल करण्यात येत असून शनिवारी राज्य सरकारच्या वतीने सुधारित अादेश जारी करण्यात अाले. त्यानुसार अांतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची अट शिथिल करण्यात अाली असून केवळ पाचव्या स्तरावरील गावातून ये-जा करताना किंवा त्या गावात जाताना ई-पास बंधनकारक करण्यात अाला अाहे. ‘ब्रेक द चेन’चे शनिवारी काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटवण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे संबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे.

कोरोना संसर्गाची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरीत्या सुरू कसे होतील हे पाहणे एवढ्याचकरिता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेड्सची दैनंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील. संबंधित जिल्ह्यांचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

तीन महिन्यांत सर्वात कमी रुग्णवाढ, रिकव्हरी रेट ९५%
राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) शनिवारी तब्बल ९५ टक्क्यांवर गेले. ३ महिन्यांत शनिवारी प्रथमच सर्वात कमी १३,६५९ कोरोना रुग्णांचे निदान झाले. १० मार्च २०२१ रोजी आजच्याइतकेच रुग्ण आढळून आले होते. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही १ लाख ८८,०२७ इतकी झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ५८ लाख १९ हजार २२४ झाली आहे.

औरंगाबादचा निर्णय आज
अद्याप औरंगाबाद शहर व जिल्हा अनलॉकचा निर्णय झालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सकाळी १० वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादेतील रुग्णालयांत मृत्युमुखी पडलेले काहीजण बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा निकष मृत्यूच्या आकड्यांशी तपासावा लागेल. त्यास वेळ लागणार असल्याने अनलॉकची नियमावली रविवारी जाहीर होईल.

पालिका व जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय घटक : वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहे.
अ. बृहन्मुंबई महानगरपालिका, औरंगाबाद, नाशिक मनपा, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल.

ब. ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळा प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)

क. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकते. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...