आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Coronavirus | Maharashtras Buldhana Government Hospital Ward Boy Arrested For Changing Swabs Samples In Laboratory

पैशांसाठी कोविड नियमांशी खेळ:बुलडाण्यात पैसे घेऊन स्वॅबचे नमुने बदलणाऱ्या वार्डबॉयला अटक, सुट्टीसाठी प्रायव्हेट कर्मचारी बनवायचे बनावट कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका प्रायव्हेट कर्मचाऱ्याच्या विरोधातही दाखल झाली केस

बुलडाणा येथून एका वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी टेस्टिंगसाठी आलेल्या स्वॅबमध्ये हेराफेरी करत होता. सरकारी रुग्णालयात काम करणारा हा वॉर्डबॉय पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी 2 ते 5 हजार रुपये घेत असे. त्याने मुख्यतः खाजगी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या लोकांना बनावट कोरोना रिपोर्ट दिला होता.

लोक कार्यालयातून सुट्टी घेण्यासाठी असे करत असत
बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या तक्रारीवरून आरोपी वॉर्ड बॉय विजय राखुंडे यांना अटक करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारा विजय पैसे घ्यायचा आणि स्वॅब बदलत होता. यानंतर, पॉझिटिव्ह अहवालाच्या आधारे, बहुतेक खासगी कर्मचारी ऑफिसमधून सुट्टी, इंश्योरेंस आणि इतर मेडिकल क्लेमचा लाभ घेत होते.

असा झाला प्रकरणाचा खुलासा
विजयने ज्या लोकांचा स्वॅब बदलला होता. त्यामधील एक डॉ. निलेश टापरे यांचा जवळचा होता. त्यांनी संभाषणादरम्यान ही माहिती निलेश यांना दिली आणि हे प्रकरण उघडकीस आले. निलेश यांनी प्रथम याबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला.

एका प्रायव्हेट कर्मचाऱ्याच्या विरोधातही दाखल झाली केस
पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचारी चंद्रकांत उमापच्या विरोधातही केस दाखल केली आहे. या कर्मचाऱ्याने वार्ड बॉयला दुसऱ्यांसाठीही चार स्वॅबचा बंदोबस्त करण्यास सांगितले होते. खामगाव पोलिसांचा दावा आहे की, या केसमध्ये अजुन काही लोकांचा समावेश असू शकतो. पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...