आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाचा कहर वाढत जात आहे. आज राज्यात तब्बल 1 हजार 8 रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 506 वर पोहचला आहे.
आज औरंगाबादमध्ये नव्या 32 रुग्णांची नोंद झाली, तर एकाचा मृत्यू झाला. तसेच, यवतमाळमध्ये 2 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यातील बळींचा एकूण आकडा 486 वर गेला आहे. गुरुवारी राज्यात 180 कोरोनाग्रस्त बरे झाले. राज्यात आजवर 1773 रुग्ण बरे झाले.
सोलापुरात रुग्णसंख्या 102 दिवसभरात 21 पॉझिटिव्ह
कोरोनाबाधितांमध्ये संख्येत बुधवारी २१ ने वाढ झाल्याने आता शहर, जिल्ह्यातील रुग्णांचा १०० आकडा पार केला आहे. २१ पैकी २० रूग्ण केगाव येथील निगराणी कक्षातील तर एक रुग्ण शास्त्रीनगर परिसरातील आहे. सुरुवातीस पाच, त्यानंतर दहा तर आता थेट रुग्णांची संख्या २० ने वाढत आहे. २१ मध्ये १४ पुरूष तर ७ महिला रूग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण शास्त्रीनगर परिसरातील आहेत. १०२ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यामध्ये दिवसभरात १२७ रुग्ण, ७ जणांचा मृत्यू
पुणे शहर अाणि जिल्ह्यात काेराेनाचा प्रार्दुभाव वाढतच असून बुधवारी एका दिवसात तब्बल १४३ नवीन काेराेना रुग्ण सापडले होते. तर गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अाणखी १२७ नवीन रुग्ण सापडले. यात ७ जणांचा मृत्यू झाला. अातापर्यंत पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या १७२२ पर्यंत पाेहचली असून मृत्यूची संख्या ८६ झाली अाहे. नवीन काेराेना रुग्णांचा परदेश प्रवास झालेला नसल्याने प्रशासनासमाेरील अडचणीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
साताऱ्यात ४४ पॉझिटिव्ह
वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका १० वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. साताऱ्यात एकूण ४४ बाधित रुग्ण आढळले आहेत.
धुळ्यात सहा जणांचा मृत्यू
शहरातील मच्छीबाजार परिसरातील काेराेनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. कोरोनाने मृतांची संख्या सहा झाली अाहे. तर आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात डांगुर्णे येथील २८ वर्षीय तरुणाचा तर धुळे शहरातील १९ वर्षीय युवतीचा समावेश अाहे.
जळगावात १० बळी
कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या अमळनेर येथील ६५ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात काेराेनाने आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. त्यातील अमळनेरच्या सहा जणांचा समावेश असलयाचे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.