आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव मनपावर भाजपचा झेंडा:भापजने बेळगाव महापालिकेवर एकाहाती सत्ता काबित करत फुलवले कमळ; महाराष्ट्र एकीकरण समितीचा धक्कादायक पराभव

बेळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 58 जागेंसाठी 385 उमेदवार रिंगणात

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. यासोबतच महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत 58 जागांसाठी 385 उमेदवार रिंगणात होते.

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजपला 35, काँग्रेसला 10, अपक्ष 8 तर महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालामुळे भाजप आणि सेनेत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली आहे. बेळगावातील जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत देत सत्ता सोपवली आहे.

भाजपला स्पष्ट बहूमत
बेळगाव महानगर पालिका निवडणूक 58 जागेसाठी घेण्यात आली होती. कोणत्याही पक्षाला बहूमतासाठी 33 जागा जिंकाव्या लागत होत्या. परंतु, भाजपने बेळगाव मनपावर एकहाती सत्ता काबिज करत आपला झेंडा फडकवला आहे. भाजपला या निवडणुकीत 35 जागा मिळाल्या आहेत.

58 जागेंसाठी 385 उमेदवार रिंगणात
बेळगाव महानगर पालिकांची ही निवडणूक 58 जागांसाठी होती. दरम्यान, यामध्ये तब्बल 385 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसह सर्वपक्षीय उमेदवारांनी आपापल्या पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवली. अनेक दिग्गज नेते हे प्रकाराच्या रिंगणात उतरले होते. यात भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...