आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील वडगाव (ता. हदगाव) येथील शेतशिवारात एका प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. तरुणाने आपल्या मोबाइलवरील स्वत:च्याच श्रद्धांजलीचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते यावरून घटना उघडकीस आली.
मृत तरुणाचे वय २२ वर्षे व तरुणीचे वय १८ वर्षे आहे. रविवारी (ता.२) मध्यरात्री वडगाव शेतशिवारात दोघांनी विष पिऊन जीवनयात्रा संपवली. या वेळी त्यांनी आपल्या मोबाइलवरील स्वत:च्याच श्रद्धांजलीचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे त्यांच्या मित्रांनी हे स्टेटस पाहिले. त्यांना फोन केला, परंतु दोघांनीही उचलला नाही. यावरून घटनेचा उलगडा झाला असून दोघांचेही मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. दरम्यान, दोघांचे एकमेकांवर प्रेम असून लग्नास दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता, अशी चर्चा होत आहे. दोन्ही मृतांचे शवविच्छेदन तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी केले.
या घटनेच्या माहितीवरून पोलिस ठाण्यात दोन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फौजदार बालाजी किरवले व बीट जमादार पंडित कल्याणकर हे करत आहेत. दरम्यान, वडगाव शिवारात तरुण-तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती सोमवारी सकाळी सात वाजता मिळाली. सदरील तरुणाने मोबाइलवर श्रद्धांजलीचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले होते. दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून चौकशीत कारण स्पष्ट होईल, असे तामसा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.