आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाकडे नजरा:मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्याची परवानी द्या; दाम्पत्याची सर्वोच्च न्यायालयात याचिका

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्यातल्या एका दाम्पत्याने केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आता यावर काय निर्णय येणार, याची उत्सुकता आहे.

सध्या देशभरात मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल केल्याने तिचे महत्त्व आहे. अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत.

नेमके प्रकरण काय?

अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख हे पुण्यातल्या बोपोडी भागात राहतात. हे दाम्पत्य गेल्या वर्षी रमजान महिन्यात पुण्यात कॅम्प भागात होते. ते खरेदीसाठी येथे गेलेले. नमाज अदा करण्याची वेळ आली. तेव्हा हे पती-पत्नी एका मशिदीजवळ गेले. तेव्हा फक्त अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश मिळाला. फरहान यांना बाहेर पावसात उभे राहावे लागेल.

बोपोडीत केली मागणी

अन्वर आणि फरहान तिथून आपल्या बोपोडतल्या घरी आले. तेव्हा त्यांनी तिथल्या मशिदीच्या व्यवस्थापनाकडे महिलांना मशिदीत प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. मात्र, मशिदीच्या व्यवस्थापनाने ती फेटाळून लावली. याविरोधात या दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

बोर्ड झाले मवाळ

अन्वर आणि फरहान यांनी याचिका दाखल करून महिलांना मशिदीमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली. त्यामुळे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड मवाळ झाले. त्यांनी पुरुषांप्रमाणेच मुस्लीम महिलांनाही मशिदीत जाऊन नमाज पठणाचा अधिकार असल्याचे मान्य केले. त्यानंतर बोपोडीतल्या मशिदीत महिलांसाठी नमाज पठणाची परवानगी मिळाली.

आता पुढे काय?

पुण्यातल्या बोपोडीमध्ये मुस्लीम महिलांना मशिदीच्या व्यवस्थापनाने नमाज पठणाची वेगळी सोय केली आहे. मात्र, सध्या फक्त याच मशिदीमध्ये ही परवानगी मिळाली आहे. आता अन्वर आणि फरहान शेख या दाम्पत्याने देशभरातल्या मशिदीत मुस्लीम महिलांसाठी नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. यावर न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल.