आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण:अर्णब गोस्वामी यांना कोठडीत दिलेल्या वागणुकीची न्यायालयाने दखल घ्यावी- देवेंद्र फडणवीस

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी प्रकरणात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. फडणवीसांनी सोमवारी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली.

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्णब गोस्वामींना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अर्णब गोस्वामींकडून सातत्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहेत. अलिबागवरून तळोजा तुरुंगात नेत असताना अर्णब गोस्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन

अर्णब गोस्वामींच्या अटक प्रकरणात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही- अनिल देशमुख

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. हे प्रकरण बंद झाले होते, पण अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली."

बातम्या आणखी आहेत...