महाराष्ट्रात कर्फ्यूचा दुसरा दिवस: पुणे-मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाट; किराणा, भाजीपाला मार्केटमध्ये दिसली सोशल डिस्टंसिंग

  • महाराष्ट्रातील कर्फ्यूची परिस्थितीसंदर्भात प्रमुख शहरांतील लाइव्ह अपडेट्स

दिव्य मराठी

Mar 25,2020 04:07:27 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बुधवारी कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे. देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन जारी करण्यात आला असताना महाराष्ट्रात परिस्थिती बदलताना दिसून येत आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि इतर शहरांमध्ये लोक आणि वाहनांची गर्दी काहीशी कमी झाली. भाजीपाला मार्केट आणि किराणा दुकानांसमोर आता गर्दी टळली आहे. महाराष्ट्रात कर्फ्यूला 2 दिवस झाले तरीही गेल्या 5 दिवसांपासून लॉकडाउन सुरूच आहे. यावेळी दूध, बेकरी आणि भाजीपालासह किराणा दुकानांवर सुद्धा लोक सोशल डिस्टंसिंग करताना दिसून आले. आवश्यक साधन सामुग्री घेण्यासाठी बाजारात आलेले लोक एकमेकांपासून दूरच थांबत आहेत.

सुरक्षित अंतर ठेवा, काळाबाजार केल्यास कठोर कारवाई -उपमुख्यमंत्री

देशातील रुग्ण कोरोनामुक्त होत असून ही एक आनंदाचीच बाब असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यासोबतच, त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालय स्टाफचे आभार मानले. संचारबंदी असली तरीही राज्यात वीज पुरवठा सुरळीत आहे. सोबतच, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, पुरवठा यापुढेही कायम नियमित सुरू राहील असे पवारांनी आश्वस्त केले. तरीही ग्राहकांनी गर्दी करू नये. खरेदी करत असताना सुरक्षित अंतर ठेवूनच उभे राहावे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पैठणः कर्फ्यूतही असे टोळक्याने बसत आहेत ग्रामस्थ, आरोग्य अधिकाऱ्यांनी हात जोडून केली विनंती

पैठण तालुक्यातील आडुळ प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावामध्ये अशी गर्दी करून गप्पा मारत बसलेल्या ग्रामस्थांना, घरात बसा एकत्र गर्दी करू नका आम्ही डॉक्टर आहोत लाठ्या घेऊन फिरू शकत नाही, अशा कडक भाषेत सांगताना आरोग्य अधिकारी...

दादर येथील भाजीपाला मार्केटमध्ये पोलिसांच्या देखरेखीत खरेदी करताना नागरिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले, कुणीही घाबरून जाउन गर्दी करू नये -मुख्यमंत्री

नवापूर शहरातील किराणा दुकान जनरल स्टोअर्स, भाजीपाला विक्रेते यांच्यासमोर नगरपालिका प्रशासनाने कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एक मीटरच्या अंतरावर रिंग तयार करून ग्राहकांना उभे रहण्याची जागा तयार केली आहे .करून आजारापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. ही नवी संकल्पना राबवली आहे नवापूर नगरपालिकेचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत नगरसेवक,पत्रकार प्रतिष्ठित नागरिक यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये ही दुकानासमोरील रिंग संकल्पना हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे यामुळे समूहाने किराणा दुकानावर होणारी गर्दी टाळता येणार आहे या उपक्रमाचे नवापूर शहरातील नागरिकानी पालक करावे असे आहवान नगर पालिकेच्या नगराध्याक्षा हेमलता पाटील पोलीस निरीक्षक विजयसिग राजपूत यांनी केले आहे.

.

X