आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गर्भापर्यंत पोहचला कोरोना:गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला कोरोनाची लागण, व्हर्टिकल ट्रांसमिशनचे देशातील पहिलेच प्रकरण

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या विस्ताराबाबत दररोज नवीन रिसर्च समोर येत आहेत. यादरम्यान पुण्यातील ससून जनरल हॉस्पीटलने दावा केला आहे की, येथील एका गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. महिलेल्या डिलीव्हरीच्या एका महिन्या आधी ताप आली होती, नंतर डिलीव्हरी झाल्यावर बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

व्हर्टिकल ट्रांसमिशनचे पहिलेच प्रकरण

हॉस्पिटलने सांगितल्यानुसार, बाळाला प्लेसेंटाच्या माध्यमातून कोरोना संक्रमण झाले आहे. हे कोरोना व्हायरस व्हर्टिकल ट्रांसमिशनचे देशातील पहिलेच प्रकरण आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, बाळ गर्भाशयात असताना संक्रमण झाल्यास, याला व्हर्टिकल ट्रांसमिशन म्हणतात. संक्रमित आईकडून प्लेसेंटाच्या माध्यमातून व्हायरस गर्भातील बाळाला झाला.

ठीक झाल्यानंतर आई-बाळाला डिस्चार्ज देण्यात आला

डॉ. किणीकर म्हणाल्या की, "बाळाला दुसऱ्या एका स्वतंत्र वार्डात ठेवले होते. जन्माच्या दोन-तीन दिवसानंतर बाळाता ताप आणि सायटोकिन स्टॉर्मची लक्षणे दिसली. बाळाला दोन आठवडे ट्रीटमेंटसाठी ठेवण्यात आले. कोरोना मुक्त झाल्यानंतर आई-बाळाला घरी सोडण्यात आले.