आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड:क्रिकेटपटू पृथ्वी शॉला सिंधुदुर्ग पोलिसांनी रोखले, ई-पास नसल्याने आंबोलीत एक तास ताटकळत

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन सुरू आहे. असं असताना देखील भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ विना ई-पास मुंबईहून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाणाचा प्रयत्न करत होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पोलिसांनी त्याला ई-पासची विचारणा केली असता पृथ्वी शॉ जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याने पृथ्वीचा चांगलाच गोंधळ उडाला. अखेर त्याने ई-पास काढून पोलिसांना दाखवल्यानंतरच त्याला सोडण्यात आले.

अखेर ई-पास काढूनच त्याला गोवा गाठावे लागले : पृथ्वीची गाडी आंबोली पोलिस नाक्याजवळ आली होती. तेव्हाच आरोग्य विभागाने त्याची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तपासणीसाठी ई-पास मागितला तेव्हा मात्र त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचा पास नसल्याचे त्याने सांगितले. आणि तिथेच त्याचा गोंधळ उडाला. आंबोली पोलिसांनी पास शिवाय त्याला जाता येणार नाही, असे सांगत त्याला तपासणी नाक्याजवळच थांबवले. तेव्हाच पृथ्वी शॉने आंबोलीतूनच ऑनलाईन ई-पाससाठी अर्ज केला. पूर्ण एक तासानंतर त्याचा ई-पास तयार होऊन त्याची कॉपी मोबाइलवर आल्यावर त्याला आंबोली पोलिसांनी जाण्याची परवानगी दिली. तेव्हा तो वेळेवर काढलेला ई-पास आंबोली पोलिसांना दाखवून पृथ्वी शॉ गोव्याकडे मार्गस्थ झाला.

आंबोलीमध्ये एक तास थांबावे लागले
ई-पास असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी त्याला खडसावून सांगितले. त्यानंतर लगेच ऑनलाइन पास काढून पृथ्वी गोव्याकडे रवाना झाला. यात विचार करण्याची बाब अशी की, मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र, महाराष्ट्रातील आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे क्रिकेटपटू पृथ्वी शॉला एक तास आंबोलीमध्ये थांबून राहावं लागलं.

बातम्या आणखी आहेत...