आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:बालविवाह प्रकरणात नऊ जणांवर गुन्हा, अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांवरही कारवाई

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उसाच्या शेतात खुरपणी करताना अल्पवयीन मुलगी व तिच्या आईला नेत बालविवाह लावल्याच्या प्रकरणात मंगळवारी चौकशीनंतर मुलीच्या आई-वडिलांसह नऊ जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. “दिव्य मराठी’मध्ये १९ जुलै रोजी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चाइल्डलाइनचे कर्मचारी व प्रशासनातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी गावात जाऊन या प्रकरणाशी संबंधित चौकशी केली. मुलीचे मामा गणेश थोरात यांनी या प्रकरणात तक्रार दिली.

पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्याच्या दृष्टीने साेमवारी तक्रार दाखल हाेऊ शकली नव्हती. पीडित मुलगी आई, वडील, एक भाऊ व बहिणीसह सेलू तालुक्यात राहत होते. पालक ऊसतोड कामगार असल्याने ते पाथरी तालुक्यातील मंजरथ येथे गेले होते. परंतु तिचा दाखला सेलूतील एका शाळेत होता. तेथे ती सहावी वर्गात शिकत असल्याची नोंद आहे. तेथूनच नातेवाईक व चाइल्डलाइनच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी वयाचा दाखला काढून ती अल्पवयीन असल्याचा पुरावा मिळवला व पाथरी येथे गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास घोडके, जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोविंद अंधारे, बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. संजय केकाण, पाथरी पोलिस ठाण्याचे पोलिस िनरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अहिरे, महिला पोलिस कर्मचारी बहिरे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश साठे, एकात्मिक बालविकास प्रकल्प समन्वयक एम. व्ही. गायकवाड, चाइल्डलाइन जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साळवी, ग्रामसेवक गणेश संगेवार यांनी मंजरथ येथे जाऊन मंदिरात काही ग्रामस्थांची बैठक घेऊन या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेतली व कारवाईची दिशा निश्चित केली.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
- बळजबरी बालविवाह केल्याप्रकरणात अल्पवयीन मुलीची आई-वडील {ज्या मुलासोबत बालविवाह झाला होता तो २८ वर्षीय किशोर सूळ - त्याची आई कुशावर्ता सूळ {भटजी कालिदास रोडे {लग्नाला हजर असलेला भास्कर सावंत {सखाराम आश्रोबा गिरगुने {सुभाष काळे {अरुणा सुभाष काळे

यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम, १९२९ कलम ९, १०, ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ (ब), भारतीय दंड संहिता १८६० कलम २६९, २७०, १८८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीला सोबत घेऊन पथक परभणीला रवाना
आराेपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीला बाल न्याय व हक्क कायद्यानुसार बालकल्याण समिती परभणी यांच्यासमाेर हजर करण्यात येणार आहे. पुढील परिस्थितीचा विचार करून समिती एक तर मुलीला बालनिरीक्षणगृहात ठेवू शकते किंवा आई-वडिलांच्या ताब्यात देऊ शकते.

1098 वर साधा संपर्क
बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. परंतु बालविवाह होत असल्याची माहिती कळल्यास ती १०९८ या क्रमांकावर कळवावी, जेणेकरून तो रोखण्यात येईल, असे आवाहन चाइल्डलाइन जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी केले.

लग्नाची जागा शोधली
चौकशीसाठी गावात गेलेल्या पथकाने सर्वप्रथम गावात जाऊन चौकशी केली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या भटजी कालिदास रोडेला घेऊन लग्न लावल्याची जागा शोधली. त्यात लग्न हे बाणेगाव शिवारातील कृष्णा रोडे यांच्या शेतात लावल्याचे समोर आले. ज्या दिवशी लग्न झाले त्या दिवशी मुलीचे मामा गणेश थोरात हे काही खासगी कामानिमित्त गावी गेले होते. गावात आल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली व नंतर प्रकरण उघडकीस आले.

बातम्या आणखी आहेत...