आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची जनआशीर्वाद यात्रा:जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली; समारोपदिनी नारायण राणेंची शिवसेनेवर टीका

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवार यांनी आपलं खातं सांभाळावं

जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपदिनी कणकवलीत शिवसेनेवर प्रखर टीका केली. सिंधुदुर्गात या यात्रेचा समारोप झाला. जनआशीर्वाद यात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वेळी अपशकुन झाला, मात्र शिवसेनेचे १०-२०च्या वर कुठे कार्यकर्ते दिसले नाहीत, असे ते म्हणाले. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली.

संजय राऊत यांनी स्वत:च्या मालकांच्या मुलांकडे लक्ष द्यावे. माझ्या मुलांची काळजी करू नये. माझी मुले हुशार आहेत. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे. राणेंवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेत चांगली वागणूक मिळते. सामनातील अग्रलेखात वैयक्तिक टीका केली तर प्रहारमधून त्यांच्यावर टीका करणार असल्याचे राणे म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती होत आहे, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड नाही, तर उघडपणे चर्चा झाली, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांना त्या काळामध्ये जिवाला धोका होता. त्या वेळी मी ढाल करून त्यांच्या पाठीमागे राहिलो होतो. मात्र, आताचे शिवसैनिक हे माझ्या गाड्यांच्या मागून धावत आहेत, असे राणे म्हणाले.

अनिल परब, तुम्ही किती दिवस लपणार?
‘मला अटक करण्याची भाषा करताना पंतप्रधान, राष्ट्रपती असल्याप्रमाणे अनिल परब आदेश देत होते. तुम्ही किती दिवस लपणार?’ असे म्हणत राणेंनी परब यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, सूक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?
राणेंचे प्रत्युत्तर :
एका दिवसात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे. पवार अज्ञानी आहेत. माझे खाते रोजगार निर्माण करणारे, जीडीपी वाढवणारे, निर्यात वाढवणारे आहे.

संजय राऊत म्हणाले होते, राणे यांच्या कारकीर्दीचे सर्वाधिक नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे
राणेंचे प्रत्युत्तर :
माझ्या मुलांवर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. माझ्या मुलांची बरोबरी कोणीही करू नये. त्यांच्याकडून वाईट कृत्य होणार नाही. पण वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर आणाल तर मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...