आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Cyclone Tauktae (Mumbai Rain) Latest Update | Weather Forecast Cyclone Tauktae Latest Today News; Maharashtra Mumbai, Thane, Palghar

मुंबईतून तौक्ते:मुंबईत येत्या काही तासांत 120 किमी ताशी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद

चक्रीवादळ तौक्ते मुंबईला स्पर्श करत गुजरातकडे सरकले आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार, या वादळाने मुंबईत येताच आपले रौद्र रुप धारण केले. यादरम्यान 185 किमी/तास वेगाने वारे वाहत होते. हवामान खात्याने पुढच्या काही तासात येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दरम्यान 120 किमी / तासाच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात रायगडमधील दोन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका जणांचा समावेश आहे. यापूर्वी जळगावातही दोन बहिणींने या चक्रीवादळात आपले जीव गमावले आहे.

दुपारी 3.31 समुद्रात हाय टाइडचा इशाराही देण्यात आला आहे. अनेक भागनमध्ये पाणी साचल्याची समस्या दिसून येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

या वादळामुळे मुंबईतील लसीकरण थांबवण्यात आले आहे. मुंबईतील विमानतळदेखील 11 ते 2 बंद करण्यात आले. याशिवाय, हाय टाइड दरम्यात 10 ते 13 फूट उंच लाटा दिसून आल्या.

मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यातही लसीकरण बंद करण्यात आले आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यात अलर्ट जारी केला आहे. 'ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मुंबईमध्ये NDRF च्या तीन पथकांना तैनात करण्यात आले असून, 5 टीम अलर्टवर आहेत. 5 ठिकाणी शेल्टर होम बनवण्यात आले आहेत. शहरातील दादर, वरळी, लोअर परेळ, माटुंगा आणि माहिमसह मुंबईतील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राइववर उंच लाटा येत आहेत.

मुंबईच्या समुद्रात 10 ते 13 फूट उंच लाटा
तौक्ते चक्रीवादळाने आपले रौद्र रुप धारण केले आहे. दरम्यान, यामुळे सोमवारी 2.23 वाजताच्या सुमारास 10.99 फूट वर लाटा गेल्या. तर पहाटे 8.24 वाजता लो-टाईडच्या वेळी 3.28 फूट उंच लाटा उठल्या. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दुपारी 3.31 मिनिटांनी समुद्रात हाय-टाईडच्या दरम्यान 13.26 फूट उंच तर 9.37 लो-टाईडच्या वेळी 6.79 फूट उंच लाटा उठल्या होत्या.

तौक्ते चक्रीवादळ हे सतत गुजरातच्या दिशेने जात आहे. मात्र, त्याचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहे.
तौक्ते चक्रीवादळ हे सतत गुजरातच्या दिशेने जात आहे. मात्र, त्याचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...