आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Dadra And Nagar Haveli MP Mohan Delkar's Suicide Case Will Be Investigated And Action Will Be Taken Against The Culprits Anil Deshmukh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार आत्महत्या प्रकरण:दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई होणार- अनिल देशमुख

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका खासदाराने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

दोन दिवसांपूर्वी दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. यासोबतच पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सप्ष्ट केले आङे.

याप्रकरणी अनिल देशमुख म्हणाले की, जो व्यक्ती सात वेळा खासदार म्हणून निवडून येतो, अशा व्यक्तीने आत्महत्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होतात. डेलकर यांनी मुंबईतच येऊन आत्महत्या केली यामागे काय कारण असेल? तसेच त्यांनी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणी जबाबदार आहे का? दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे जबाबदार आहेत का? त्यांच्या दबावाखाली आत्महता केली का? प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? प्रफुल्ल पटेल यांचा प्रशासनावर दबाव होता म्हणून मुंबईत आत्महत्या केली का? तिथे न्याय मिळणार नाही म्हणून मुंबईत आत्महत्या केली का?, असे अनेक सवाल उपस्थित होतात. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, असे देशमुख म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

दादरा आणि नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर दक्षिण मुंबईमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हवरील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळला. पोलिसांना त्यांच्या रुममध्ये एक गुजराती भाषेत लिहीलेली सुसाइड नोट सापडली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे.

डेलकर यांचे वय 58 वर्षे होते. ते 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते 7 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी 1989 पासून 2004 पर्यंत सलग 6 वेळा लोकसभेत विजय मिळवला. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर, दोन मुले अभिनव आणि दिविता आहेत.

भाजप, काँग्रेस आणि अपक्ष खासदार झाले

मोहन डेलकर यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1998 च्या निवडणुकीत भाजपकडून विजय मिळवला. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2004 मध्ये त्यांनी भारत नवशक्ति पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आणि परत एकदा विजयी झाले. 2019 मध्येही अपक्ष राहून विजयी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...