आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम:राज्यात यावर्षी दही हंडी उत्सव होणार नाही, कोरोना संक्रमणामुळे समन्वय समितीने घेतला निर्णय

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव (अष्टमी पूजा) ला साध्या पद्धतीने साजरी करण्याचे निर्देश दिले

कोव्हिड-19 च्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणाऱ्या दही हंडी उत्सवाला रद्द करण्यात आले आहे. हा निर्णय दही हंडी समन्वय समितीकडून घेण्यात आला आहे. परंतू, कृष्ण जन्माष्टमीची पुजा साध्या पद्धतीने केली जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव (अष्टमी पूजा) ला साध्या पद्धतीने साजरी करण्याचे निर्देश दिले.

दही हांडी समन्वय समितीचे बाळा पडेळकर यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे यावर्षी दही हंडी उत्सह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सहावत मोठ्या संख्येने लोक जमा होतात आणि एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, यामुळे कोरोना संक्रमण वाढू शकते. यामुळे कमेटीने यावर्षीचा उत्सव रद्द केला आहे. या निर्णयावर समिती ठाम आहे आणि पुनर्विचारही केला जाणार नाही, असेही बाळा यांनी सांगितले.

समितीने म्हटले-आमचा आदेश संपूर्ण राज्यात मान्य असेल

दही-हांडी समन्वय समितीचे अरुण पाटिल यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रमध्ये अंदाजे 1100-1200 दही हांडी मंडळ आहेत. यातील अनेक मुंबई आणि ठाण्यात आहेत. आम्ही घेतलेला निर्णय नागरिकांसाठी आहे, याचे पालन राज्यातील सर्व मंडळाना करावे लागेल. 

बातम्या आणखी आहेत...