आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू , विद्युत कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

वर्धा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदी मेघे परिसरात राहणारे ५० वर्षीय शेतकरी शेतात काम करीत असतांना शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची घटना (दि २७ जून) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक विकास रामभाऊ महाकाळकर (वय ५० रा वार्ड क्रमांक ४ सिंदी मेघे वर्धा) त्यांच्या कडे उमरी मेघे शिवारात २३ एकर शेत असून,त्या शेतामध्ये महिला मजूर घेऊन ते काम करीत होते. विहिरी जवळील विद्युत खांबा जवळ असलेल्या तारेला विद्युत प्रवाह असल्यामुळे त्यांचा त्या तारेला स्पर्श झाला.त्या विद्युत प्रवाहाच्या झटक्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी विद्युत कर्मचाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कुटुंबातील सदस्यांना शेतकऱ्याची चूक असल्याचे सांगितले. तारेला विद्युत प्रवाह होत असल्याची माहिती विद्युत मंडळाला देऊनही निष्काळजीपणा दाखविली असल्यामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटूंबियांकडून केला जात आहे.मृतक हा घरातील प्रमुख होता.त्याच बरोबर त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असून,त्यांच्यामागे  आई , पत्नी,दोन मुले आहेत.शेतीच्या कामकाजात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...