आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Decision Regarding Starting Schools In The State Will Be Taken Based On The Situation Of Kovid: Varsha Gaikwad Info

हिंगोली:राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात कोविडची परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाणार- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील गणेशोत्सवाच्या गर्दीनंतर कोविडची परिस्थिती पाहूनच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, विलास गोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यात ता. १५ जुलैपासून ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला होता. मात्र त्यानंतर बालरोगतज्ञ, शिक्षणतज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत.

मात्र आता गणेशोत्सव संपला असून यावेळी मोठी गर्दी झाली होती. त्याचा पुढील काही दिवसांत काय परिणाम जाणवतो तसेच काय परिस्थिती निर्माण होते यावरच शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य अग्रेसर आहे. पोलिस विभागाच्या माध्यमातूनही महिला सुरक्षेवर लक्ष दिले जात आहे. महिलांवर अत्याचाराच्या होणाऱ्या घटना महिला लोकप्रतिनिधी म्हणून मनाला चटका लावणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. महिला अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालावेत यासाठी शक्ती कायदा आणण्याचे प्रयत्न असून त्यासाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच मुली व मुलांना समान वागणुक दिली गेली पाहिजे, यासाठी समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. तर मुला-मुलींच्या समान वागणुकीबद्दल शिक्षणामध्येही ही बाब अंतर्भुत करावी लागणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...