आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदार राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दीपक केसरकर म्हणाले की, आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता, त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
केसरकर काय म्हणाले?
दीपक केसरकर म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या विधानानंतर आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता. त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत आहेत. राज्यात बदल घडला नसता तर युती पुन्हा आली नसती, आणि शिवसेना संपवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला असता, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
युतीवर प्रतिक्रिया
दीपक केसरकर म्हणाले की, पुढील सर्व निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केले आहे.
बारसूवर प्रतिक्रिया
दीपक केसरकर म्हणाले की, हा प्रकल्प व्हावा याची मागणी उद्धव ठाकरेंनी लेखी स्वरूपात केली होती. लोकांना संघर्ष करायला लावायचा याच्यातून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. हेच राजकारण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झाले, असा आरोपही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत झाले आहे. शेवटी जनतेनेच आता सज्ज झाले पाहिजे कारण हा विरोध राजकीय कारणातून केला जात असल्याचे केसरकर यांनी म्हटलं आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.