आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Deepak Kesarkar Statement On Ajit Pawar; Kesarkar Strange Statement On Ajit Pawar | Deepak Kesarkar | Ajit Pawar

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?:तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो. अस काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचे उत्तर वेळ आल्यावर देईल. ते काय घडल याच आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही. शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिर्डीत बोलत होते.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच तोंडभरुन कौतुक करण्यात आलय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याचेही दिपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले, अजित दादा काहीही बोलले तरी त्यांचे मन मात्र निर्मळ आहे. याची मला खात्री आहे. मी अजित पवार यांच्याबरोबर काम केलेले आहे. बोलताना फटकऴ बोलतील पण एक विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहेत. जसा आम्हाला मुख्यमंत्र्याचा अभिमान आहे. तसा आम्हाला अजित पवारांचा देखील अभिमान आहे, दीपक केसरकर असेही म्हणाले.

कटुता कमी करणे त्यांच्या हातात

दीपक केसरकर उद्धव ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले, कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी त्यांचा आदर करणारा मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विजवावी लागते. असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आले त्याचे दुख वाटले.

वेळ आल्यावर उत्तरे देऊ

दीपक केसरकर पुढे म्हणाले,असा सल्लाही दीपक केसरकर यांनी शिवसेनेला आणि ठाकरेंना दिला.

बातम्या आणखी आहेत...