आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा:देहूत तुकोबांच्या पालखीचे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान, छत्रपती संभाजीराजेंनी घेतला फुगडीचा आनंद

देहूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देहूमध्ये मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा पार पडला.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज देहूतून तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान झाले. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी उपस्थिती लावली. संभाजीराजेंनी यावेळी फुगडीचा आनंद लुटला.

देहूमध्ये मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा पार पडला. पालखी प्रस्तानाच्या वेळी दरवर्षी सकाळपासूनच संपूर्ण देहूगाव संतांच्या आणि विठ्ठलाच्या गजराने दुमदुमून जात असते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

बाहेरच्या गावावरुन एकही वारकरी देहूमध्ये येऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. यासोबतच संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान करण्यात आले.

पालखीचे प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराजांच्या पादुका 1 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच राहणार आहेत. वारीतील सर्व उपक्रम येथे घेतले जातील.

त्यानंतर 19 जुलैला एसटीने या पादुका पंढरपूरला रवाना होतील. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...