आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींना अटक:लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, राहुल गांधींसोबतच्या धक्काबुक्कीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी यमुना एक्सप्रेसवरुन पायी जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. यादरम्यान, राहुल गांधींना धक्काबूक्की करण्यात आली आणि यात त्यांच्या हाताला मुका मार लागल्याची माहिती आहे. या प्रकरावार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटद्वारे संताप व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले वर्तन निंदनीय आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.'

राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की

काय आहे प्रकरण ?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधींना ग्रेटर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या गावाकडे जाताना राहुल आणि प्रियंका यांची गाडी अडवण्यात आली, त्यानंर दोघे पायी हाथरसकडे जात असताना पोलिसांनी राहुल यांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल खाली पडले, पोलिसांनी राहुल यांच्या शर्चटी कॉलरदेखील पकडली. काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे की, राहुल यांच्या हाताला दुखापतही झाली आहे.

राहुल यांच्या हाताला मुका मार लागला.
राहुल यांच्या हाताला मुका मार लागला.

याबाबत राहुल गांधी म्हणाले की, "पोलिसांनी मला धक्का दिला, खाली पाडले आणि लाठीचार्ज केला. या देशात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालण्याचा अधिकार आहे का ? सामान्य व्यक्ती चालू शकत नाही ? मला पीडितेच्या कुटुंबाची भेट घ्यायची आहे,मला ते थांबवू शकणार नाहीत."

बातम्या आणखी आहेत...