आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर मात:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. अजित पवार यांनी स्वतः ट्वीटरवरुन माहिती दिली. पवार यांनो कोरोनाची लागण झाल्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. अखेर कोरोनावर मात केल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अजित पवारांना थंडी, ताप जाणवू लागल्याने 22 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यात त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. पण, खबरदारी म्हणून त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतले होते. पण, तब्येत सुधारत नसल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. 26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर उपचाराअंती अजित पवारांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.