आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Deputy Chief Minister Ajit Pawar's Visit To The Flood hit Area; Promises To Help And Rehabilitate Flood Victims; News And Live Updates

उपमुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा:पुरग्रस्त भागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट; पुरग्रस्तांना मदत व पुनर्वसन करण्याचे दिले आश्वासन

भिलवडी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भिलवडी बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी बोटीतून केली पाहणी

महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या सांगली दौऱ्यावर आलेले आहेत. दरम्यान, आज त्यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या आहेत.

राज्य सरकारने महापुरामुळे अनेक लोकांना स्थलांतरित केले आहे. त्यामुळे पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याबाबतची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतली. ते पुढे म्हणाले की, भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

भिलवडी बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी बोटीतून केली पाहणी
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...