आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना उपचार खर्च:विमा असूनही खासगी रुग्णालये रुग्णांकडून उपचाराचा खर्च घेत आहेत, भाजप नेते किरीट सोमैया यांचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमैया यांनी इंश्योरेंस रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाला पत्राद्वारे तक्रार केली आहे
Advertisement
Advertisement

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी आरोप लावला आहे की, आरोग्य विमा असूनही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून उपचाराचा खर्च घेत आहेत. सोमैया यांनी इंश्योरेंस रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया(आयआरडीए)ला पत्राद्वारे याची तक्रारदेखील केली आहे.

रुग्णांकडून आधी पैसे घेतले जात आहेत

2 जुलैला लिहीलेल्या पत्रात सोमैया यांनी म्हटले की,"काही रुग्णालये रुग्णांकडून आधी पैसे घेत आहेत. उपचारानंतर विमा कंपन्यांकडून पैसे मिळाल्यावर ते रुग्णांना पैसे परत करत आहेत. कोरोना उपचारासाठी लागणारा इतका मोठा खर्च तात्काळ देणे शक्य नसल्यामुळे रुग्णांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे."

खासगी रुग्णालयांना दिशा-निर्देश जारी करण्यास सांगितले

किरीट सोमैया पुढे म्हणाले की, आयआरडीएने या प्रकरणात लक्ष घालून रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरवण्यासाठी खासगी रुग्णालयांना दिशा-निर्देश जारी करावेत.

किरीट सोमैया यांचे ट्वीट ...

Advertisement
0