आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Devendra Fadanvis । Amravati । It Is A Well planned Conspiracy That Nothing Like This Has Happened In Tripura, It Is Very Wrong To Hold Rallies Devendra Fadnavis

हिंसाचार प्रकरण:त्रिपुरात असे काही घडलेच नाही हे एक सुनियोजित षडयंत्र, मोर्चे काढणे अत्यंत चुकीचे- देवेंद्र फडणवीस

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज भाजपाच्या वतीने अमरावती जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला हिंसक वळण मिळाले आहे. आंदोलनकर्त्यांनी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून, दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीसांना आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला.

अमरावतीमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्रिपुरात अशी कोणत्याही प्रकारे घटना घडलेली नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

“अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण ज्या प्रकारचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतंय. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे अत्यंत चुकीचे आहे.” असे फडणवीस म्हणाले.

“त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलने होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हे देखील प्रकाशित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली आहे”,अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

कोणतीही मशीद त्रिपुरामध्ये जाळण्यातच आलेली नाही. असे असताना त्या अफवांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यावर हिंदूंची दुकाने जाळायची हे देखील योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणे करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकाने टार्गेट करणे हे देखील बंद झाले पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे. असे आवाहन देखील फडणवीसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...