आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका:‘मातोश्री’नेच आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही जाणे बंद केले नाही

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुसती स्तुती करू नका, त्यांच्यासारखे काम करा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी व सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दौऱ्यात मातोश्रीवर जाणार का, असा प्रश्न नांदेड येथे पत्रकारांनी फडणवीस यांना विचारला. यावर ते म्हणाले की, या दोन्ही ठिकाणचे संदर्भ वेगळे आहेत. मुळात हा प्रश्नही चुकीचा आहे. ‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही जाणे बंद केले नाही.

फडणवीस बुधवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. दरम्यान, गायकवाड आयोगाने स्थापन केलेल्या संस्था रा.स्व.संघाच्या आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्त्याने केला आहे. त्याचे तुम्ही अध्यक्ष असून त्यांनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “हे कोण प्रवक्ते आहेत त्यांनी अकलेचे तारे तोडले. त्यांनी प्रथम अभ्यास करावा. ज्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे असे ते सांगतात, ते अध्यक्षपद आता माझ्याकडे आले आहे.

नुसती स्तुती करू नका, त्यांच्यासारखे काम करा
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली. यासंबंधी बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या नेत्याचे काम सगळ्यांना आवडते ही चांगली गोष्ट आहे. माझा अशोकरावांना सल्ला आहे, त्यांनी नुसती स्तुती करू नये. त्यांच्यासारखे काम करावे. तुमचीही स्तुती होईल. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील कोविड केंद्रास भेट दिली तेव्हा माहिती घेताना देवेंद्र फडणवीस.

बातम्या आणखी आहेत...