आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? वारकर्‍यांचा असा अपमान?; कराडकरांवरील कारवाईचा फडणवीसांकडून निषेध

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता.

कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची मागणी आहे. असे असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या ते नजरकैदेत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

'वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे! तीव्र निषेध!' अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे.

पालखी सोहळ्यात वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते.

शनिवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नजरकैद केले. त्यांनी दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात मुक्काम केला होता. त्यानंतर यांच्या समर्थक वारकऱ्यांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात केली होती. आंदोलनाची परिस्थिती असतानाच आमदार महेश लांडगे याठिकाणी दाखल झाले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह पदाधिकारी- कायकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...