आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फडणवीसांकडून पोलखोल:'काल मुंबईत थोडे कमी म्हणजे 806 रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण...'

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मुंबईतील आकडा मोठा आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाना साधला आहे. 'काल मुंबईत थोडे कमी म्हणजे 806 रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ 3300 चाचण्या झाल्या,' असा आरोप फडणवीसांनी केला. 

मुंबईत मंगळवारी 806 करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी नाशिकय येथील पत्रकार परिषदेत संवाद साधताना म्हटले की, 'चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरने लक्षणे असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर चाचण्यांचे अहवाल 24 तासात कसे येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणे असलेल्या रूग्णांच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. तसेच, खाजगी रूग्णालयांकडूनही मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडेही राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,' अशी सूचनाही फडणवीसांनी यावेळी दिल्या.

पुढे ते म्हणाले की, 'जनतेने स्वत: जाऊन चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल, तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात. केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला? याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी करोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे,' असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

0