आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Devendra Fadanvis Press Conference News And Updates; I Was Under Pressure In 2018 By Shivsena For Sachin Waze Devendra Fadanvis

फडणवीसांचा हल्लाबोल:सचिन वाझे, परमबीर सिंह छोटी माणसे, त्यांच्या मागचा सुत्रधार शोधा- देवेंद्र फडणवीस

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • '2018 मध्ये वाझेंना पोलिस दलात घेण्यासाठी माझ्यावर दबाव'

अँटीलिया स्फोटके, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या सर्वांमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'सचिन वाझे आणि परमबीर सिंह छोटी माणसे आहेत. त्यांच्या मागचे हात शोधा', अशी मागणी फडणवीस यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो किंवा इतर हायप्रोफाईल केसेस असो, सर्व सीआययूकडेच जात होत्या. विभागात सीपीनंतर सचिन वाझेंचा वट होता. ते नेहमी मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. सचिन वाझे यांना वसुली अधिकाऱ्याच्या रुपात बसवण्यात आले होते. मुंबईत डान्सबार सुरु ठेवण्यात सूट आणि सर्वाचे इन्चार्ज सचिन वाझे होते, असे फडणवीस म्हणाले.

'मनसुख हिरेन प्रकरण NIAने आपल्या हाती घ्यावे'

फडणवीस पुढे म्हणाले की, 'एटीएस आणि NIA कडे टेप आहेत. त्याl वाझेने त्यांना काय काय म्हटले ते स्पष्ट आहे. एटीएसकडून सुरुवातीला अॅक्शन दिसली, पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने आधी अटक करुन त्यांना एनआयएकडे ताब्यात द्यायला हवे होते. कारण ही दोन्ही एकमेकांशी संलग्न प्रकरणे आहेत. त्यामुळे एटीएसकडे जे प्रकरण आहे ते एनआयएने टेकओव्हर करावे,'असे फडणवीस म्हणाले.

'वाझेंच्या सांगण्यावरुन स्कॉर्पियो गाडी तेथे लावली'

फडणवीस पुढे म्हणाले की, 'हे मनसुख हिरेन प्रकरण भयानक आहे. वाझे त्यांना पहिल्यापासून ओळखत होते. स्कॉर्पिओ त्यांनी हिरेन यांच्याकडून घेतली पण पैसे दिले नाहीत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात ती गाडी त्यांच्याकडे होती. हिरेन यांनी वाझेंकडे पैसे मागितले होते. पैसे द्या नाही तर गाडी परत द्या, असे सांगितले होते. अँटीलिया प्रकरणात स्कॉर्पिओ गाडी चोरी झाली असती तर काहीतरी टेम्परिंग वगैरे झाले असते. म्हणजे मनसुख यांना हे सांगितलं गेलं होतं की, गाडी तिथे लाव आणि चावी आणून द्या. ती चावी सचिन वाझेंनी घेतली. त्यांना सांगितलं, उद्या जाऊन तुम्ही गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करा, त्यानुसार कुर्ला पोलिसांत तक्रार दाखल केली. तिथल्या ड्युटी ऑफिसरला सचिन वाझेंनी फोन करुन गुन्हा दाखल करायला लावला. जाणीवपूर्वक तीन दिवस सचिन वाझेच तपास करत होते,' असेही फडणवीस म्हणाले.

'हायटाईडमुळे मृतदेह बाहेर आला'

फडणवीस पुढे म्हणाले की, 'रात्री मनसुख हिरेन यांना फोन येतो,ते जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह आढळतो. आमचा हाच दावा आहे की, वाझेंनीच त्यांना मारुन, मृतदेह खाडीत फेकला. त्यांचा अंदाज चुकला. त्यांना वाटलं लोटाईड आहे. पण अर्धा तासाचा फरक पडला. हायटाईडमुळे त्यांचा मृतदेह बाहेर आला. अन्यथा तो बाहेर आला नसता. पोस्टमॉर्टममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. इतके रुमाल तोंडात कसे होते, त्यांना बांधले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या फुप्फुसात पाणी असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र रिपोर्टमध्ये ते नाहीच. पाण्यात बुडून मृत्यू झाला असता तर फुप्फुसात पाणी असते, ते न मिळाल्यामुळे ही हत्याच आहे हे अधोरेखित होते,' असेही फडणवीस म्हणाले.

'2018 वाझेंना पोलिस दलात घेण्यासाठी माझ्यावर दबाव'

फडणवीस पुढे म्हणाले की, 2004 मध्ये वाझे निलंबित झाले होते. 2007 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतली. पण तरीही त्यांची व्हीआरएस स्वीकारली गेली नाही. कारण त्यांच्यावर चौकशी सुरू होती. 2018 मध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी शिवसेनेकडून दबाव होता. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत घेण्यात यावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. पण, त्यांची भूतकाळातील पार्श्वभूमी पाहिल्यानंतर मी अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. मी अॅडव्होकेट जनरल यांना फाईल दाखवली. या प्रकरणात हायकोर्टाने त्यांना निलंबित केले होते. म्हणूनच मी त्यांना सेवेत न घेण्याचा निर्णय घेतला होता,' असे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...