आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोला:'मोठ्या अभिनेत्यांबद्दल काही बोलल्यावर दिवसभर प्रसिद्धी मिळते'; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ'

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मोठ्या नेत्यांबद्दल बोललं की, दिवसभर प्रसिद्धी मिळते', असा टोला फडणवीसांनी नाना पटोले यांना लगावला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. 'नाना पटोलेंचे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोलल्यावर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ', असा टोला फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला.

बातम्या आणखी आहेत...