आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे अधिवेशन होणार का नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे,' असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, 'हे सरकार कोरोनाच्या नावाखाली विरोधक आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू असतात, तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का?' असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, 'संजय राठोड प्रकरण असो की वीज कापण्याचे प्रकरण असो, विरोधी पक्ष नेहमी आक्रमक राहील. अशा प्रकरणात उघडे पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकारला काहीच देणेघेणे नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणे म्हणजे स्वत:च्या आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीचा विषयच अजेंड्यावर आणला गेला नाही', असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.