आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातल्या 8 कोटी जनतेला आता मोफत उपचार मिळणार आहेत, अशी माहिती सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षणाखालोखाल सर्वात जास्त खर्च होतो तो आरोग्यावर. त्यामुळे फडणवीस यांनी सांगितलेली नेमकी ही योजना आहे तरी काय, जाणून घेऊयात.
नेमकी योजना काय?
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 500 आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्या योजनेला मूर्त स्वरूप देत आज देवेंद्र फडणवीस यांनी 300 आपला दवाखान्याचे उद्घाटन केले. यावेळी फडणीस म्हणाले की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एक चांगली योजना सुरू आहे. या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत मिळतो. तर पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून 5 लाखांचा उपचार मोफत मिळतो.
शस्त्रक्रियेत लाभ...
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनांमधून 900 शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळतील. त्याचा राज्यातल्या 12 कोटींपैकी तब्बल 8 कोटी लोकांना फायदा होईल. किडनी प्रत्यारोपणासाठीही 4 लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आता आपला दवाखानातूनही अनेक सेवा मोफत मिळतील. दवाखान्यात तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्णय गतिमान...
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्पना मांडली. ती तानाजी सावंत यांनी पूर्णत्वास नेली. महाविकास आघाडीचे सरकार असताना एक रुपयांत उपचार करण्याची घोषणा केली. मात्र, अडीच वर्षांत त्यांनी एकही दवाखाना सुरू केला नाही. आम्ही 500 दवाखाने सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर दोनच महिन्यात 300 दवाखाने सुरू होत आहेत. हीच गतिमान सरकारची पावती असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.