आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:शिवसेना नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत- देवेंद्र फडणवीस

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत'

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये,' असा टोला यावेळी त्यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, 'शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. पण, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही.'

'आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचे, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे. या निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल,' असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

एक सक्षम सरकार राज्याला देऊ

'आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ,' असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले.

जयंत पाटलांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप केला होता. त्याचाहीर फडणवीसांनी समाचार घेतला. 'जयंत पाटलांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत त्यांना ईव्हीएम मशीनवरही खापर फोडता येणार नाही, म्हणून आता जयंत पाटलांनी बोगस मतदारनोंदणीचा मुद्दा उकरून काढलाय, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser