आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही:पाण्याचा थेंब थेंब वाचवावा लागणार; देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

50 टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र अवर्षणग्रस्त आहे. पाऊस कमी पडतो. त्यामुळे जलसंधारणाची गरज आहे. महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. बालेवाडीत पार पडणार पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रमात त्यांनीया कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान उपस्थित होते. बारा तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे. आता निर्णय घेतला आहे की अॅग्रीकल्चर फीडर सोलरवर आणणार, त्यामुळे दिवसा बारा तास शेतकऱ्यांना मिळेल.

नैसर्गिक शेतीवर भर दिली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
नैसर्गिक शेतीवर भर दिली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागे आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवाराची योजना राबवली होती. 20 हजार गावात जलसंधरणाची कामे झाली होती. 37 लाख हेक्टर जमीन संचिनाखाली आली. जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण सुरू करतोय. या दुसऱ्या टप्प्यात आपण 5 हजार गावे घेतली आहेत. यावर्षी अलनिनो असणार हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा थेंब थेंब वाचवला लागणार आहे, जलसिंचनाची काम करावी लागणार आहेत. जलयुक्त शिवाराशिवाय पर्याय नाही. यासाठी पाणी फाऊंडेशन खूप चांगले काम करत आहे.

शेतकऱ्यांना पिकविमा लवकर मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय आता राज्य सरकारने 1 रुपयात पीकविमा आणला आहे, असे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

अर्थसंकल्पाशी संबंधित बातम्या

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी:वार्षिक 12 हजार रुपये मिळणार, केवळ एका रुपयात पीक विमा

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख:जाणून घ्या- यंदाच्या अर्थसंकल्पातील आरोग्यासंदर्भातील महत्त्वाच्या घोषणा

अंगणवाडी-आशा सेविकांच्या मानधनात वाढ:लेक लाडकी अभियानासह फडणविसांनी केल्या 'या' महत्वाच्या घोषणा

नव्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी:अर्थसंकल्प मांडताना देवेंद्र फडणवीसांची घोषणा, कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणार

देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात मांडले 'पंच अमृत':शेतकरी, महिला, गुंतवणुक, रोजगार, पर्यावरणपूरक विकास यांचा समावेश

बातम्या आणखी आहेत...