आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना जातीवरुन टार्गेट केले जाते- प्रवीण दरेकर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण असल्यामुळे ट्रागेट केलं जात असल्याचे वक्तव्य एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले. त्यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, 'काही मुठभर लोक पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या कुठल्यातरी नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट करतात', असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रवीण दरेकर म्हणाले की, 'राज्याला 40 वर्षे मराठा मुख्यमंत्री लाभले, ही 40 वर्षे कोणाची सरकार होते? पण ते आरक्षण देऊ शकले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच काही मुठभर लोक पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या कुठल्यातरी नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट करतात. परंतू, पण, मराठा समाजाला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाला कोर्टात टिकेल असे आरक्षण दिले, ते या सरकारला टिकवता आले नाही. पुरागामी महाराष्ट्राचे कौतुक करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ व्यक्तीच्या तोंडातून असे वक्तव्यं येतं हे अत्यंत वेदनादायक आहे. टीका करणाऱ्यांनी यावर विचार करायला हवा,' असे दरेकर म्हणाले.