आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकण दौरा:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर; केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रविण दरेकरही सोबत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस आणि राणेंनी दिली ट्विटरवरुन माहिती

राज्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खेड, महाड आणि चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री सलग दोन दिवसापासून नुकसानग्रस्त भागाचा दौऱ्यावर आहेत. ते आज चिपळूणमध्ये मदत व बचावकार्याचा आढावा घेणार आहे. तर दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेतेदेखील कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रविण दरेकरदेखील उपस्थित आहेत.

फडणवीस आणि राणेंनी दिली ट्विटरवरुन माहिती
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या दौऱ्याच्या माहिती आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन दिली आहे. कोकणातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी ते मुंबईतून प्रस्थान केले आहे. कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी हे तिन्हीही नेते दौऱ्यावर दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...