आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मी 'अमृता'कडे वळतो:फडणवीसांच्या कोटीवर विधिमंडळात हास्यकल्लोळ; म्हणाले - अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही भलताच अर्थ काढाल

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात शाश्वत शेती, शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योजक, आदिवासी, मागासवर्ग आदी समाजातील सर्वच घटकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. 'देशाच्या अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प असून, तो पंचामृत ध्येयांवर आधारित आहे,' असे फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी एकेक्षणी 'अमृता' नावाचा उच्चार केला. ते ऐकूण विरोधक अक्षरशः खदखद हसले.

त्याचे झाले असे की...

देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत होते. त्यामुळे सभागृहात वातारवण काहीसे धीरगंभीर झाले होते. पण फडणवीसांनी भाषणात अचानक 'अमृता' असा नामोल्लेख करत कोटी केली. त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकून सभागृहातील वातावरण काहीसे हलके-फुलके झाले.

आता पंचम अमृताकडे वळतो

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उल्लेख केला. तसेच राज्य सरकार पंचामृतांवर आधारित अर्थसंकल्प सादर करत असल्याचे सांगितले. त्यानुसार पहिल्या 4 अमृत योजनांचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी शेवटच्या पाचव्या योजनेचा उल्लेख केला.

ते म्हणाले, 'यानंतर मी पंचामृतांपैकी पंचम अमृताकडे वळतो.' त्यावर एका सदस्याने त्यांना 'पंचम अमृत' शब्दाऐवजी 'पंचामृत' शब्द वापरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी बेल वाजवून सर्वांना शांत राहण्याची सूचना केली.

त्यानंतर फडणवीस म्हणाले, "मला सावधपणे बोलावे लागते. कारण, अमृताकडे वळतो म्हटल्यावर तुम्ही भलताच अर्थ काढाल". त्यांच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाशी संबंधित खालील बातम्या वाचा...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प:शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांना फडणवीसांचे गिफ्ट; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर षटकार!

एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा सन्मान निधी, राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा पाच लाख अशा घोषणा केल्या. फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प ठळक स्वरूपात. येथे वाचा संपूर्ण बातमी...

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही देणार शेतकरी सन्मान निधी:शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपये मिळणार, केवळ 1 रुपयात पीक विमा

केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...