आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्माचा दुरुपयोग करून देशाविरोधात रचलेले षडयंत्र, ब्रेनवॉशिंग करून महिलांवर होणारे अत्याचार, द केरला स्टोरी या सिनेमाने काही सत्यकथांमधूनन समोर आणलेत. आता सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चित्रपट पाहिल्यानंतर ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘द केरला स्टोरी’वरून भाजप विरुद्ध विरोधक असे चित्र देशभरात रंगले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सिनेमाचे कौतुक केले. त्यामुळे राज्यातही विरोधक आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शकाला चौकात फाशी देण्याची गरज व्यक्त केली होती. फडणवीसांनी या साऱ्यांना हे उत्तर दिले.
सिनेमातून जनजागृती
देवेंद्र फडणीस म्हणाले की, ज्या प्रकारचे एक षडयंत्र चाललेले आहे. ब्रेनवॉश करून मुलींना एक्स्प्लॉइट केले जात आहे. धर्माचा दुरुपयोग केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सत्यकथेच्या माध्यमातून बाहेर आलेल्या आहेत. मला वाटते की, हा सिनेमा स्टोरी सांगण्याकरिता नाही. हा जनजागृती करण्याकरिता आहे. याच्यानंतर अशाप्रकारे कुठल्या मुलीवर वेळ येऊ नये. याकरिता हा सिनेमा तयार झाला आहे.
आव्हाडांना उत्तर
देवेंद्र फडणीस म्हणाले की, हा सिनेमा पाहिल्यावर मी एकच गोष्ट म्हणेन, जे लोक असे बोलले आहेत की, या सिनेमाच्या डायरेक्टरला भर चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आलीय, असे हा सिनेमा पाहिल्यानंतर मी म्हणू शकतो, असे म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना उत्तर दिले.
कायदा कडक करा
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आपल्याला कायदा कडक करावा लागेल. त्या सोबत एक समाजाचे नेटवर्क उभे करावे लागेल. एक जागरुकता देखील आणावी लागेल. कारण कायदा सगळ्या गोष्टी करू शकतो, असे नाही. यामुळे जागरुकता आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चेहरे समोर आणेल
देवेंद्र फडणीस पुढे म्हणाले की, हा केवळ एक सिनेमा नाही. तर काही सत्यकथांवर आधारित ही जनजागृतीची मोहीम आहे. ज्या प्रकारे ब्रेनवॉशिंग करून महिलांवर अत्याचार होतोय. त्या माध्यमातून देशाविरोधात एक षढयंत्र सुरू आहे. त्याला समोर आणण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. हा चित्रपट जागरुकता निर्माण करेल. देशाविरोधांत षडयंत्र रचणाऱ्यांचे चेहरे समोर आणेल.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.