आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. 'महाराष्ट्रात आणीबाणी लागून करुन देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे आहे',अशी टीका राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केली.
'मराठा आंदोलकांची सरकारकडून होणारी गळचेपी म्हणजे दुसरी, आणीबाणीच होय',या फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'भाजपला हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटते. आणीबाणी निर्माण करुन फडणवीसांना परत सत्तेत यायचे आहे,' असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, 'इंदिरा गांधीच्या काळातील आणीबाणीचा शिवसेनेला विसर पडलेला नाही. मोदी सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल. लोकशाहीमध्ये विरोधी आवाजाला देशद्रोही ठरवणे हीदेखील एकप्रकारची आणीबाणी आहे. मुळात मोदी सरकार हे डबल स्टँडर्ड सोडाच, पण झिरो स्टँडर्ड आहे,' असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.