आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देशातील पाच राज्यांसह महाराष्ट्रातील पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपच्या समाधान औताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे, पण आता कोरोनाशी लढायचंय', असे फडणवीस म्हणाले.
या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, 'भाजपवर पंडरपुरच्या जनतेने विश्वास दाखवला आहे. मी पंढरपूरच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचे काम पंढरपुरच्या जनतेना केले, असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 'आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचे मी अभिनंदन करतो. जमिनीशी जुळलेले व्यक्तीमत्व म्हणून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत प्रशांत पारिचारक आणि उमेश पारिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे उभे राहिलेत. रणनिती आखून ही निवडणूक लढवली गेली आणि यात आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वादही मिळाला, असेही ते म्हणाले.
'अजित पवारांचा गर्व मोडून काढला'- गोपीचंद पडळकर
या निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते गोपीचंद पडळर यांनीही प्रतिक्रिया दिली. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकडून टीका केली. ते म्हणाले की, 'मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही गर्व झाला होता, त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मतदारांनी मोडून काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.