आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी लैंगिक शोषणाची तक्रार केलेल्या रेणू शर्मा यांची बहिण आणि धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनीच आता मुंडेंविरोधात तक्रार केली आहे. दरम्यान, करुणा यांच्या फेसबुक पोस्टबाबत माहिती मिळतात खुद्द धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, 'आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार केल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत मी खुलासा करू इच्छितो की, करुणा शर्मांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असुन, त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे.'
'सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसून येतो. कृपया सदर बाब ही न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही,' असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.