आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Dhananjay Munde News And Updates; 'Keep Humanity Even In Such A Case, Express Your Opinion After Checking The Truth'; Sanjay Raut's Advice To BJP Leaders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनंजय मुंडे प्रकरण:'अशा प्रकरणात तरी माणुसकी ठेवा, सत्यता तपासून मत व्यक्त करा'; संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना सल्ला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठे शस्त्र बनत आहे'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आङे. यानंतर आता सत्ताधारी नेत्यांनी भाजपवर हल्ला बोल सुरू केला आहे. यातय, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना एक सल्ला दिला आहे. 'कमीत-कतमी अशा प्रकरणात तरी माणुसकी ठेवा, सत्यता तपासून मत व्यक्त करा', असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले.

या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, अशा प्रकरणामध्ये तरी राजकीय राग, लोभ, द्वेष आणू नका. अशा प्रकरणात किमान माणुसकी ठेवली पाहिजे. वेळ दिला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावरील जो डाग दूर झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला आहे, अशी प्रतिक्रिया तांनी दिली.

'चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठं शस्त्र बनत आहे'

संजय राऊत पुढे म्हणाले की, ' भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फार संयमी भूमिका घेतली होती. फडणवीसांची ही भूमिका भाजपच्या इतर नेत्यांनी समजून घ्यायला हवी. चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठे शस्त्र बनत आहे. हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण नाही. जर ते कुणी करत असेल तर ते महाराष्ट्राला डाग लावत आहेत', असे राऊत म्हणाले.