आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील पावसाचा अनुभव:'ना सामान्य माणुस ना मंत्री, निसर्गापुढे कोणाचेच चालत नाही'; तीन तास पावसात अडकलेल्या धनंजय मुंडे यांचा अनुभव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला पावसाने झोडपून काढले. बुधवारी मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक जागी पाणी तुंबले, लोकल रेल्वेसह वाहतूक ठप्प झाली, शेकडो वृक्ष कोसळले. मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले अाहे. काल मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे रस्ते बंद झाले होते. यामुळे शेकडो गाड्यांना बराच वेळ एकाच जागेवर थांबावे लागले. दरम्यान, या पावसाचा फटका सामान्यांसोबत मंत्र्यांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे काल मुंबईत झालेल्या पावसादरम्यान तीन ते साडे तीन तास एकाच जागेवर अडकून पडले होते. त्यांचा हा पावसाचा अनुभव धनंजय मुंडे यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगिताल आहे.

यादरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, 'मी गेली २४-२५ वर्षांपासून मुंबईला येत आहे. पण, काल अनुभवलेली मुंबई, यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ईस्टन फ्री वे ब्रिजबर एकाच जागेवर गाडी तीन ते साडेतीन तास गाडी उभी होती. मी सकाळी साडे नऊ वाजता परळीवरुन मुंबईकडे निघालो होतो. मुंबईत दाखल झाल्यानंतर पावसामुळे मला एकाच जागेवर थांबावे लागले. यावेळी खूप भूक लागली होती, पोटात कावळे ओरडत होते. ही भूक आईने सकाळी निघताना सोबत दिलेल्या दशम्यांनी भागवली.'

छाती ऐवढ्या पाण्यातून गेलो

मुंडे पुढे म्हणाले की, 'तीन साडे तीन तासानंतरही रस्त्यावरची एकही गाडी पुढे जात नव्हती. अखेर पालिकेच्या आणि पोलिसांच्या मदतीने समोरच्या काही गाड्या बाजुला घेत छातीइतक्या पाण्यातून गाडी चालवत सीएसटी रेल्वेस्टेशनपर्यंत आलो. स्टेशनवर एक-दीड तास थांबलो आणि अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेट करुन चालत पुढच्या स्टेशनपर्यंत गेली आणि शेवटी रात्री साडे आकरा वाजता नियोजीत ठिकाणी पोहचलो.'

'मला संध्याकाळी शरद पवारांच्या बैठकीला जायते होते, पण पावसामुळे जाता आले नाही. त्यांना मी फोटो आणि व्हिडिओ पाठवून परिस्थितीची माहिती दिली. याबाबत इतकच सांगले की, नैसर्गिक आपत्ती आल्यावर ना सामान्य माणुस, ना मंत्री मंत्री, कोणाचेच चालत नाही. हा अनुभव मला काल आला.' अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली.

मुंबई शहरात १२ तासांमध्ये २१५.८ मिमी पावसाची नोंद

मुंबईत ताशी ३० ते ५० मिमी वेगाने पाऊस कोसळला. कुलाबा वेधशाळेत १२ तासांत २९३ मिमीची नाेंद झाली. हा ऑगस्टमधील २२ वर्षांतील विक्रमी पाऊस आहे. मुंबईत यंदाचा सर्वाधिक २१५.८ मिमी पाऊस पडला. पालघरमध्ये दोनच तासांत तब्बल २६६ मिमी पाऊस कोसळला आहे.

पुढचे २४ तास धोक्याचे

मुंबईसह उत्तर कोकण तसेच घाट परिसरासाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. येत्या २४ तासांत या भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...