आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Dhavali Village In Satara District Is In Danger Of Collapsing; Villagers Demand Administration To Rehabilitate After Konkan Incident; News And Live Updates

दरडग्रस्त गाव:सातारा जिल्ह्यातील धावली गावावर दरड कोसळण्याचा धोका कायम; ​​​​​​​कोकणातील घटनेनंतर पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक कुटुंबांनी केले शाळा, मंदिरामध्ये स्थलांतर

मुसळधार पावसाने धावली (ता.महाबळेश्वर ) गावावर भूस्खलनामुळे दरडी कोसळण्याच्या धोका कायम असून सर्व ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. राज्य शासनाने आमच्या गावाचे पूर्ण पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, धावली गावामध्ये दरड कोसळण्याचे सत्र पाऊस कमी झाला असतानाही सुरूच आहे. गावच्या वरच्या बाजूला सुमारे ५०० फूट उंच डोंगरकडा आहे आणि त्याच्या वर तीव्र उतार असलेला सुमारे २५० फूट उंच असलेली डोंगरकडा आहे.

या दोन्ही डोंगरकडयाच्या मधील भागात भूस्खलन होत आहे. यामुळे प्रचंड प्रमाणावर दरड आणि माती खाली वसलेल्या धावली गावाच्या वरच्या बाजूने कोसळत आहेत. दोन्ही डोंगरकडाच्या मधल्या भागात भूस्खलन होत असल्यामुळे वरच्या डोंगरकड्याच्या खालील दगड मातीचा भराव कमी होत आहे. त्यामुळे वरील डोंगरकडा कधीही निसटून धावली गावावर कोसळू शकतो. हे कडे गावासाठी अत्यंत धोकादायक झालेले आहेत.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व अर्थिक नुसान होण्याची शक्यता वाटत असल्याने ग्रामस्थांनी संभाव्य धोका टाळून आमचे माळीण होऊ नये यासाठी आमचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे अशी मागणी बुधवारी ग्रामस्थांनी केली आहे. काही वर्षांपूर्वी माळीण आणि आता कोकणातील तळीये हे गावच दरडीखाली गाडल्या जाऊन अनेकांचे मृत्यू झाले. त्यामुळे प्रशासन आता तरी यातून काही बोध घेते का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अनेक कुटुंबांनी केले शाळा, मंदिरामध्ये स्थलांतर
दहशतीने या डोंगराखालील अनेक कुटुंबांनी शाळा व मंदिरात स्थलांतर केले आहे. परंतु वरून कडा आणि गावच्या खालच्या बाजूला जमिनीला भेगा पडल्याने ती जमीन सरकत आहे. त्यामुळे दुहेरी संकटाने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आमचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...