आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धनगर समाजाचा एल्गार:राज्यभरात आज धनगर बांधवांचे आरक्षणासाठी 'ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन सुरू, पंढरपुरातून गोपीचंद पडळकर आंदोलनात

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ढोल बजाओ सरकार जगाओ' अशा घोषणा देत आंदोलने सुरू आहेत.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगीत दिली. यानंतर मराठा समाज पेटून उठला आहे. यानंतर आता धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजाने शुक्रवारी ढोल वाजवत आणि भंडाऱ्याची उधळण करत आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात धनगर समाजाचा एल्गार पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ढोल बजाओ सरकार जगाओ' अशा घोषणा देत आंदोलने सुरू आहेत.

सांगलीतून धरनगर समाजाचे ढोल बाजव, सरकार जगाव आंदोलन
सांगलीतून धरनगर समाजाचे ढोल बाजव, सरकार जगाव आंदोलन

आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली 'ढोल बजाव, सरकार जगाव' आंदोलन सुरू आहे. तर सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये धनगर बांधवांनी ढोल वादन करत मोर्चा काढला आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे.

पनवेलमधूनही आंदोलन
पनवेलमधूनही आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्या यावा ही मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. गेल्या वर्षी फडणवीस सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता. अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजन असतात. या सर्व योजना आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू आहेत. तर राज्यात सध्या धनगर समाजाला एनटी अंतर्गत आरक्षण दिले जाते. मात्र धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे.

औरंगाबादच्या फुलंब्रीमधून धनगर समाजाचे आंदोलन
औरंगाबादच्या फुलंब्रीमधून धनगर समाजाचे आंदोलन
बातम्या आणखी आहेत...